मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याच्या घरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीने छापा टाकला आहे. एनसीबीच्या पथकाने अर्जुनचे राहते घर तसेच त्याचे कार्यालय येथे छापा टाकला आहे. एनसीबीच्या माहितीनुसार अर्जुन रामपालच्या कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, त्याचे राहते घर आणि कार्यालय येथून काही सापडले की नाही हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू नंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने छापे टाकण्यास सुरवात केली आहे. मध्यंतरीच्या काळात बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्रींची नावे समोर आली होते. त्यातच आता अर्जुन रामपालचे नाव पुढे आले आहे. याआधी अर्जुनची मैत्रीण गॅब्रिएला डिमेट्रिएड्सचा भाऊ अगिसियालोसला एनसीबीने अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यास जामीन मिळाला होता, मात्र एनसीबीने पुन्हा त्यास ताब्यात घेतले आहे. एनसीबीने अर्जुन रामपाल यांला समन्स दिल्याचे वृत्त आहे.