मुंबई – बॉलिवूडमध्येही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळेच अभिनेता अक्षय कुमार, गोविंदा, विक्की कौशल, अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्यानंतर आता अभिनेत्री कतरिना कैफ ही सुद्धा कोरोना बाधित झाली आहे. तशी माहिती तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे. मी स्वतःची काळजी घेत असून स्वतःला वेगळे ठेवले आहे. डॉक्टरांचे मार्गदर्शन घेत आहे. आपण सर्वांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन तिने केले आहे.
