मुंबई – मराठीचा आग्रह धरणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई)ला आपले लक्ष्य केले आहे. आशिया खंडातील सर्वात जुने मार्केट असलेल्या बीएसईचे नाव बदलून मुंबई स्टॉक एक्सचेंज करण्यात यावे, अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. बीएसईची स्थापना ९ जुलै १८७५ रोजी झाली आहे. आपण मुंबई हे नाव सर्वत्र वापरतो मग बीएसईचे नावच बॉम्बे का, असा सवालही नांदगावकर यांनी विचारला आहे.
https://twitter.com/BalaNandgaonkar/status/1341622777984540672