बैल धुण्यासाठी गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने बंधा-यात बुडाला
येवला – तालुक्यातील ममदापूर येथील श्रीराम वामन साबळे (वय २३) रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बैल घेवून ममदापूर येथील गट नंबर ४९१ मधील बंधार्यावर बैल धुण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो बंधार्यात बुडाला. सायंकाळी बैल लगतच्या शेतांमध्ये गेल्याने व बंधार्याजवळ चप्पला व कपडे आढळल्याने ग्रामस्थांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, श्रीरामचा तपास लागला नाही. अंधार पडल्याने दुस-या दिवशी सोमवारी सकाळी बंधा-यात पुन्हा शोध घेण्यात आल्यानंतर श्रीरामचा मृतदेह आढळून आला.