मुंबई – पोलिसांचे नाव घेताच निर्दयी, खडूस, कठोर अशा अनेक प्रतिमा डोळ्यापुढे येतात. मात्र प्रत्यक्षात असे मुळीच नाही. पोलीसही माणूस आहेत. त्यामुळे माणसातील सर्व प्रकारचे गुण त्यांच्यातही आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसात जे काही कमी-जास्त असते तेच पोलिसांमध्येही बघायला मिळते. कधी कधी तर पोलिसांना आपण देव मानावे असेही कार्य त्यांच्या हातून घडत असते. कारण त्यांनाही ह्रदय आहेच. असाच एक आदर्श आंध्रप्रदेशमधील महिला उपनिरीक्षक सिरिशाने निर्माण केला आहे.
आंध्रप्रदेशमधील कासिबुग्गा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सिरीशाने आपल्या खांद्यावर एका भिक्षेकराचा मृतदेह घेतला आणि पायी चालत दोन किलोमीटरचे अंतर तीने कापले. त्या भिक्षेकऱ्याला स्पर्श करायलाही कुणी तयार नव्हते. अश्यात सिरिशाने त्याला खांदा दिला. आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यात एक बेवारस मृतदेह आढळला होता. हा मृतदेह एका भिक्षेकऱ्याचा होता. थंडीने गारठून त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. भिक्षेकऱ्याचा मृतदेह शेतात पडून राहिला, मात्र कुणीही त्याच्यावर अंत्यसंस्कार केले नाही आणि प्रशासनालाही कळविले नाही. या प्रकरणाची सूचना सिरीशाला मिळाली आणि तिने तातडीने घटनास्थळ गाठले. स्थानिकांना तिने घाटापर्यंत मृतदेह नेण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. मात्र कुणीही तयार झाले नाही. अखेर सिरिशाने स्वतःच त्याचा मृतदेह खांद्यावर घेतला. केवळ एक कामगार तिच्या मदतीला आला. त्याने मृतदेह बांधून दिला. सिरिशाने तो खांद्यावर घेतला आणि घाटापर्यंत घेऊन गेली. यादरम्यान व्हिडीयो काढायला कुणीच विसरले नाही. ज्यांनी मदतीला नकार दिला त्यांनीच व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल केला, हे दुर्दैव.
बघा व्हिडिओ
पुलिस वाले को अक्सर लोग निर्दयी मान बैठते हैं। आन्ध्रप्रदेश में महिला सब इन्स्पेक्टर ने २ किमी तक एक भिखारी की लाश को कंधा दिया जिसे कोई छूना नहीं चाहता था। मानवता और करुणा की ऐसी कहानी आख़िर कहाँ मिलेगी आपको। वर्दी वालों के प्रति अपनी दृष्टि बदलें। pic.twitter.com/gGQYA4oTQU
— Ashok Kumar IPS (@AshokKumar_IPS) February 1, 2021
सिरीशाने भिक्षेकऱ्यावर अंत्यसंस्कार केले. कोट्टूरु सिरिशा ही २०१७ च्या बॅचची उपनिरीक्षक आहे. व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर सिरिशाच्या जिद्दीला लोक सॅल्यूट करीत आहेत. त्यावर आयपीएल अशोक कुमार यांनी ट्वीट करीत लिहीले की, ‘पोलिसांना लोक नेहमी निर्दयी मानतात. आंध्रप्रदेशातील महिला पोलीस उपनिरीक्षकाने मानवता आणि करुणेचे उत्तम उदाहरण उभे केले आहे.’