नाशिक – बेरोजगारांसाठी दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करा या मागणीसाठी नांदगाव तालुका युवक कॅाग्रेसने तहसीलदार उदय कुलकर्णी यांना निवेदन दिले. या निवेदनात युवकांसाठी वर्षाला दोन कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान मोदी सरकार सत्तेवर आले, पण परिस्थिती वेगळीच असल्याचे म्हटले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, युवक हे निराश झाले आहेत, आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. केंद्र सरकारने रोजगारनिर्मिती करावी, तरुण हातांना काम हवे. हे निवेदन देतांना नांदगाव तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरेश्वर सुर्वे, युवक कॉंग्रेसचे दर्शन आहेर, उदय पाटील, संदीप मोरे, आशुतोष हटकर, योगेश मिसर, सागर जाधव, अक्षय कासलीवाल, सागर साळुंके यावेळी उपस्थित होते.