मोफत प्रशिक्षणामध्ये टंकलेखनामधील विशेष प्रशिक्षण तसेच लघुलेखन (इंग्रजी स्टेनोग्रॉफी) सामान्यज्ञान, इंग्रजीभाषा व मूलभूत संगणक ज्ञानासंबंधी ११ महिन्यांचा कालावधी असणारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाची सुरुवात १ सप्टेंबर पासून होणार सुरु होण्याची शक्यता असून यासाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे,शैक्षणिक पात्रता किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विद्यावेतनाची रककम १,००० रू. दरमहा इतकी असेल. या प्रशिक्षाणाव्यतिरिक्त, संगणकाच्या हार्डवेअर व स्फॉटवेअर संबंधी १ वर्षाचा कालावधी असणारे प्रशिक्षणही उपलब्ध असून त्यासाठी वरीलप्रमाणेच शैक्षणिक पात्रता आवश्यक असून वयोमर्यादा१८ ते ३० वर्षे असणार आहे.
या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेण्यासाठी इच्छूक अनुसुचित जाती तथा अनुसुचित जमातीच्या पात्र उमेदवारांनी दिनांक १८ ऑगस्ट पूर्वी प्रवेशाकरीता दिलेल्या https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd6gD7qe88Oio59N-d283XZ3b7ORp0fGfLcxdiit7o-9Cj4lw/viewform या ऑनलाईन लिंक वर अर्ज भरावा अथवा अधिक माहिती साठी ९७३०६४५४४६ या व्हाटसॲप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उपक्षेत्रीय व रोजगार अधिकारी पी. एस. पाचपोर यांनी केले आहे.