मुंबई – काही लोकांचं बेजबाबदारपणे बोलण्याचं वैशिष्ट्य असतं त्यामुळे अशा लोकांवर काय भाष्य करावं त्यांना महत्त्व न देणं हेच त्यांना उत्तर आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजपचे साक्षी महाराज यांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे.
बारामती येथे पत्रकारांनी भाजपच्या साक्षी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर विचारणा केली असता शरद पवार यांनी त्यांचं नांव न घेता चांगलाच समाचार घेतला. बेजबाबदारपणे बोलण्याचं काही लोकांचं वैशिष्ट्य असतं. कुणी शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणत असतील कोण दहशतवादी म्हणत असतील तर अशा लोकांवर काय भाष्य करावं असा टोला मिश्किल हास्य करत शरद पवार यांनी लगावला.