चांदवड – चांदवड ते मनमाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील वृक्षतोडीबाबत चांदवड ब्ल्यू पँथर सेवाभावी संस्था आक्रमक झाली आहे. सदर रस्त्यावरील वृक्षतोड नियमात आहे की नाही ,नियमविरहित किती वृक्षतोड केली जात आहे, याची चौकशी करावी या मागणीचे निवेदन संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग भडांगे यांनी चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील व चांदवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांना दिले आहे.
सदर वृक्षतोडीमुळे अनेक जुनी झाडे कत्तल होत असून पशु, पक्षी आणि माणसांचेही आरोग्य संकटात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ठेकेदाराने कोणकोणत्या अटीवर परवाणगी घेतली आहेत. त्यांना कोणत्या नियमात ही परवाणगी दिली आहेत, या सर्व कागदपत्रांची मागणी या संघटनेने केली आहे. बेकायदेशीर वृक्षतोड केली असल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. निवेदन देतांना अध्यक्ष पांडुरंग भडांगे, उपाध्यक्ष उमेश जाधव, सचिव देविदास बनकर, महावीर संकलेचा अनिल आढाव, ईश्वर अहिरे हे उपस्थित होते.