गाझियाबाद – येथील दोन युवतींचे बुलेटवर धोकादायक स्टंट केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंगळवारी सायंकाळी मुलीचे वाहनांवर स्टंट करतानाचे आणखी दोन व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामध्ये मुलगी कारच्या वर उभं राहून हातात बंदूक घेऊन स्टंट करत आहे. तर दुसर्या व्हिडिओमध्ये युवती हात सोडून बुलेट चालवत असल्याचं दिसत आहे. हे व्हिडिओ व्हायरल होताच वाहतूक पोलिसांनी युवतींना २८ हजारांचा दंड ठोठावला आहे.
कवीनगर पोलिस ठाणे हद्दीतील रहिवासी असलेल्या युवतींनी १२ सेकंदाचे व्हिडिओ बनवले आहेत. व्हिडिओमध्ये युवती बुलेट चालवत आहे. तर दुसरी युवती तिच्या खांद्यावर बसलेली आहे. त्यांनी हेल्मेट परिधान केलेलं नाही. व्हिडिओमध्ये बुलेटचा रजिस्ट्रेशन नंबर गाझियाबादचा दिसत आहे. त्या आधारावर वाहतूक पोलिसांनी बुलेटच्या मालकाला ११ हजारांचा दंड केला आहे.
संबंधित युवतीचे आणखी दोन व्हिडिओ मंगळवारी सायंकाळी व्हायरल झाले. त्यामध्ये गाडीवर स्टंट करत असल्याचं दिसत आहे. एका व्हिडिओत युवती कारच्या वर उभी राहून हातात बंदूक घेऊन स्टंट करताना दिसत आहे. तर दुसर्या व्हिडिओमध्ये युवती हात सोडून बुलेट चालवत आहे. वाहतूक पोलिसांनी दोन्ही व्हिडिओत हेल्मेट न घातल्याबद्दल एक हजार रुपये, विना परवानगी सार्वजनिक ठिकाणी स्टंट करण्यावर पाच हजार रुपये आणि सदोष नंबर प्लेटबद्दल पाच हजार रुपये दंड वसूल केला आहे.
#Ghaziabad : लड़कियों ने बुलेट पर किया खतरनाक स्टंट, सोशल मीडिया पर वीडियो वायरल होने के बाद ट्रैफिक पुलिस ने काटा 28 हजार रुपये का चालान pic.twitter.com/hAVqyhZKH6
— Hindustan (@Live_Hindustan) March 17, 2021