मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रित बुहराह याने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीसाठी टीममधून आपले नाव मागे घेतले आहे. पण घाबरू नका, बुमराहने नाव मागे घेण्याचे कारणही गोड आहे. त्याने खासगी कारण दिले असले तरीही खरे कारण लग्नाचे आहे.
कसोटी मालिका संपल्यानंतर १२ मार्चपासून पाच टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. त्यातही बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. त्यानंतर दोन्ही संघ २३ मार्चपासून एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळतील. त्यातूनही बुमराहला बाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे. बुमराह येत्या आठवड्यात लग्न करणार असून हा सोहळा गोव्यात होणार आहे. अर्थात बीसीसीआयला खरे कारण सांगण्यात आले आहे.
एका स्पोर्ट्स अँकरसोबत बुमराहचे लग्न होत आहे, असेही सूत्रांकडून कळते. या विवाह सोहळ्याच्या तारखेबाबतही गुप्तता पाळण्यात येत आहे. विशेष म्हणजे सध्या इंग्लंडविरुद्धची मालिकी सुरू असल्यामुळे भारतीय क्रिकेट संघातील बुमराहचे सहकारी विवाह सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत, हे जवळपास निश्चित झाले आहे.










