नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा विवाह गोव्यातील क्रीडा अँकर संजना गणेशनशी गोव्यात १४ आणि १५ मार्च रोजी होणार आहे. हल्दी, मेंहदी यांच्यासह दोन दिवस हा समारंभ चालणार आहे.
असे म्हटले जाते की, प्रेमात सर्व काही माफ असते, वय, जात, रंग याबाबत काही फरक पडत नाही. बुमराह आणि संजना यांच्यात बाबतही असेच काहीसे म्हटले जात आहे. संजना गणेशन ही जसप्रीत बुमराहपेक्षा वयाने मोठी आहे, परंतु यामुळे त्यांच्या प्रेमात परिणाम झाला नाही आणि दोघांनी एकमेकांना अनुरूप मानले.
भारतीय क्रिकेटमध्ये यापुर्वी सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, अजित आगरकर, जवागल श्रीनाथ, शिखर धवन यासारख्या क्रिकेटपटूंनी त्यांच्या पेक्षा वयाने मोठ्या महिलांशी लग्न केले आहे.
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेश यांच्यातील वयाचा फरक सांगायचा तर संजना गणेशन यांचा जन्म ६ मे १९९१ रोजी पुण्यात झाला, तर बुमराह यांचा जन्म ६ डिसेंबर १९९३ रोजी झाला. त्यानुसार जसप्रीत बुमराहपेक्षा संजना अडीच वर्षांनी मोठी आहे.
संजनाने अभियांत्रिकी देखील केली आहे, परंतु तिने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न केला. तिला एक नोकरी देखील मिळाली आणि या दरम्यान तिने २०१३ मध्ये फेमिना मिस इंडिया पुणे स्पर्धेतही भाग घेतला जिथे तिने अंतिम फेरी गाठली पण जिंकता आली नाही. त्यानंतर संजनाने २०१६ मध्ये अँकरिंगच्या क्षेत्रात करिअरला सुरूवात केली . तेव्हापासून ती सतत स्पोर्ट्स अँकरिंग करत आहे.