अकरावी बारावी साठीचे ऑनलाइन शिक्षण ॲप राज्यातील विद्यार्थ्यांना खुले – पालकमंत्री धनंजय मुंडे
मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण
बीड : जिल्ह्यातील इयत्ता ११ वी १२वी च्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळावे यासाठी इझी लर्निंग अॅपचे आज उद्घाटन झाले. जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण आगळा वेगळा उपक्रम आहे यामुळे बीड सारख्या मागासलेल्या जिल्ह्यात देखील कोरोना संसर्गाच्या काळात अतिशय चांगले काम झाले असून राज्यातील विद्यार्थ्यांना खुले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक झाली. याप्रसंगी ईझी लर्निंग ॲपचे लोकार्पण धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.पालकमंत्री श्री मुंडे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या या ॲपचा उपयोग जिल्ह्याबरोबरच राज्यातील विद्यार्थ्यांना देखील होईल. यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन यांचे महत्त्वाचे योगदान आहे या ॲपमध्ये तांत्रिक दृष्ट्या अधिक सुलभ करण्याची सूचना दिली.पालकमंत्री पुढे म्हणाले कोरोना संसर्गासाठी शासनाच्या वतीने अनेक उपाय योजना केल्या जात आहेत बीड जिल्ह्यातील स्थिती राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगली असली तरीही प्रशासनास अधिक सतर्क राहण्याची गरज आहे रुग्णांसाठी असलेल्या उपचाराच्या सुविधा बेडची सज्जता व्हेंटिलेटर यांची गरज या सर्व बाबींकडे लक्ष दिले जावे
जिल्हाधिकारी श्री रेखावार म्हणाले बीड जिल्ह्यातील इयत्ता अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लेक्चर्स आॅनलाइन माध्यमातून मिळावेत म्हणून तीन महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनामार्फत ईझी टेस्ट लर्निंग अॅपचे उपक्रमाची सुरुवात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते केली होती.ते म्हणाले, या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील विविध शाळातील अध्यापकांनी साडेसातशे तासाहून अधिक अकरावी व बारावी अभ्यासक्रमाच्या अध्यापनाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग तयार केले. यासाठी जिल्हा परिषद, शिक्षण विभाग , शिक्षणाधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बीड आणि अंबाजोगाई येथे अध्यापकांद्वारे तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात आले . पुणे येथील अभिनव टेक्नॉलॉजी लिमिटेड यांनी सदर अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने इझी लर्निंग ॲप द्वारे उपलब्ध करून दिला आहे त्याचे उद्घाटन करून लोकार्पण आज झाले.