नाशिक – भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ची ब्रॅाडबँण्ड सेवा खंडीत झाली आहे. बैंगलोर येथे अपग्रेडेशनचे काम सुरु असल्यामुळे ही सेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान याबाबत नाशिक बीएसएनएलचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी सांगितले की, सर्व सेवेला प्राब्लेम नाही. काही ग्राहकांचे ऑथेन्टेशन होत नाही. बैंगलोर येथील काम संपल्यानंतर सेवा सुरळीत होईल.
बीएसएनएलची ब्रॅाडबँण्ड सेवा खंडीत झाल्यामुळे अनेक ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. तर व्यापारी व व्यावसायिकांच्या कामावर परिणाम झाला. या अपग्रेडेशनच्या कामामुळे अनेक कार्यालयाच्या कामावरही परिणाम झाला.