मुंबई – भारतीय टेलीकॉम मार्केटमध्ये बीएसएनएलचे प्रीपेड प्लॅन मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. या सर्वांमध्ये हायस्पीड डेटा आणि अनलिमीटेड कॉलींग आफर केली जात आहे. यात सर्वांत उत्तम ४८५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. फ्री कॉलिंगसह १३५ जीबी डेटा या प्लॅनमध्ये मिळत आहे.
बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये युझर्सला दररोज १.५ जीबी डेटा (एकूण १३५ जीबी) सोबतच १०० एसएमएस मिळतील. तसेच कोणत्याही नेटवर्क कॉलिंगसाठी दररोज २५० मिनीट्स मिळतील. या पॅकची वैधता ९० दिवसांची असेल. रिलायन्स जिओकडेही बीएसएनएलच्या या प्लॅनला टक्कर देणारा एक प्लॅन आहे. त्याची किंमत ५५५ रुपये आहे. परंतु, वैधता केवळ ८४ दिवसांची आहे. डेटा मात्र दररोज १.५ जीबी एवढा आहे. सर्व नेटवर्कवर कॉलिंग फ्री आहे. बीएसएनएलने गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला ३९८ रुपयांचा प्रीपेड प्लान लॉन्च केला होता. या प्लॅनअंतर्गत युझर्स अनलिमिटेड डेटाचा लाभ उचलू शकतात. अर्थात युझर्स आपल्याला वाटेल त्या पद्धतीने सोयीनुसार डेटा वापरू शकतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधादेखील देण्यात आली आहे. गेल्यावर्षी बीएसएनएलने नोव्हेंबरमध्ये ५९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन लॉन्च केला होता. यात ६० एमबीपीएसच्या स्पीडने ३३०० जीबी डेटा मिळत आहे, हे विशेष.