बीएचआर संस्थेच्या संचालकांनी केलेल्या बेनामी ठेवींच्या अनियमिततेमुळे २०१५ पासून अवसायनात आलेल्या या संस्थेच्या कर्जवसुलीतून व मालमत्ता विक्रीतून येणाऱ्या पैशांमधून ठेवीदारांना “हार्डशिप” प्रकरणे स्विकारुन ठेवींचा परतावा देण्यात यावा अशी मागणी घेऊन जनसंग्राम ठेवीदार संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे यांनी विविध पातळ्यांवर लढा चालवला होता.त्यानुसार राज्याचे लोकायुक्त यांच्याकडे संघटनेने केलेल्या तक्रारींवर सुनावणी घेऊन संघटनेच्या तक्रारदार सभासदांना वसुलीच्या प्रमाणात ठेवींचा परतावा करण्याचे आदेश लोकायुक्त यांनी दिलेले आहेत. याला अनुसरून संस्थेच्या अवसायकांनी कोरोना परिस्थितीमुळे कर्जवसुली ठप्प असतांना सुद्धा जनसंग्राम ठेवीदार संघटनेच्या वतीने सादर हार्डशिप प्रकरणातील १७१ ठेवीदारांना त्यांची पैशांची नितांत आवश्यकता लक्षात घेऊन सुमारे १ कोटी ३४ लाखाची रक्कम ऐन दिवाळीत त्यांच्या खात्यावर जमा करून या सर्व ठेवीदारांची दिवाळी गोड केली आहे.ज्या गरजू ठेवीदारांना परतवा मिळाला त्यांनी अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या कामाबद्दल व जनसंग्राम संघटनेच्या पाठपुराव्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.यामध्ये नाशिक शहरातील व जिल्ह्यातील ठेवीदारांना लाभ झाला आहे.
दोन लाखांपुढील गुंतवणूकदारांना आवाहन
जनसंग्राम ठेवीदार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे संस्थेच्या तत्कालीन संचालकांवर राज्यातील ५९ ठिकाणी एमपीआयडी कायद्याने गुन्हे दाखल झाल्याने संचालकांना अटक होऊन संस्थेच्या मालमत्ता विक्री व कर्जवसुलीतून गुन्हे दाखल केलेल्या व सहतक्रारदार ठेवीदारांना मुदतीत ठेव रक्कम परत देणे अधिनियमानुसार बंधनकारक असल्याने संघटनेकडून “हार्डशिप” प्रकरणे तयार करून ठेवीदारांना कर्जवसुलीच्या प्रमाणात टप्प्याटप्प्याने ठेव रक्कम परत मिळण्यासाठी पाठपुरावा केला जातो.जनसंग्राम ठेवीदार संघटनेचे सभासद असलेल्या दोन लाखाच्या पुढील गुंतवणूकदारांनी ठेव रक्कम परत मिळावी म्हणून आपापले मूळ पावत्यांसह हार्डशिप प्रकरण दाखल करावे किंवा अधिक माहितीसाठी 7620093937 या मोबाईलवर संपर्क करावा असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.