मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना उतरली असून प्रचारासाठी जाणाऱ्या २० बड्या नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी बिहार राज्य सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी किमान ५० जागा लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला होता. त्यानुसार आता प्रचारासाठी जाणाऱ्या नेत्यांची यादी करण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्या जनता दलाने शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर आक्षेप घेतला असल्याने धनुष्यबाणाऐवजी मिळेल ते निवडणूक चिन्ह घेऊन निवडणूक लढवण्याचा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यासोबत स्थानिक मुद्दे घेऊन शिवसेना निवडणुकीच्या रिंगणार उतरणार असल्याचे दिसून येत आहे. प्रचारकांच्या यादीत १२ नावे महाराष्ट्रातील आहेत.
बघा कोण आहेत हे २० प्रचारक