पाटणा – बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची नितीश कुमार यांनी आज साडेचार वाजता शपथ घेतली. सातव्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना यामुळे मिळाला आहे. त्यांच्याबरोबर भाजप व एनडीएच्या घटक पक्षांच्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. नव्या सरकारमध्ये भाजपने सुशील मोदीं यांचा पत्ता कट केला असून त्यांच्या जागी तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी हे दोन उपमुख्यमंत्री भाजपचे असणार आहे. या सोहळ्यात गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत होते. या शपथविधी सोहळ्यात तेजस्वी यादवे बहिष्कार टाकला होता.
बिहारचा निकाल घोषित झाल्यानंतर मुख्यमंत्रीपद कोण होणार याबाबत चर्चा होती. पण, काल त्याला पूर्ण विराम मिळाला. पण, त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद बाबत चर्चा सुरु झाली.पण, शपथविधी नंतर हा विषय सुध्दा संपला. सुशील मोदी हे गेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. त्यांचे नितीशकुमार बरोबर चांगले संबधही होते. असे असतांना त्यांचा पत्ता कट करुन भाजपने नवी समीकरण समोर ठेऊन दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री नितीशकुमार असले तरी सरकारमध्ये आपले वर्चस्व असावे म्हणून मुख्यपदे आपल्याकडे ठेवण्याचे धोरण भाजपचे आहे.