पाटणा – बिहारच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सर्वाधिक १२५ जागा मिळाल्या आहेत. तर, महागठबंधननेही ११० जागांवर मुसंडी मारली आहे. रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती. महागठबंधन आणि रालोआ यांच्यातील सामना अतिशय चुरशीचा झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव, त्यामुळे बाधित झालेली अर्थव्यवस्था यासह अनेक बाबींचा प्रभाव या निवडणुकीवर होता. त्यामुळे याकडे सगळ्यांचे लक्ष होते. या निवडणुकीत राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात महागठबंधनला लक्षणीय जागा मिळाल्याने त्यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
आता मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच?
बिहारचे मुख्यमंत्रीपद सलग तीनदा भूषविणारे नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील का, याबाबत साशंकता आङे. कारण, जनता दलाला ४३ जागाच मिळाल्या आहेत. याउलट भाजप हा रालोआतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांना ७४ जागी यश मिळाले आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकल्याने भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा दावा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्रीपदाकडे लागले आहे. नितीश यांना पुन्हा संधी मिळणार की भाजपचा कुठला नेता मुख्यमंत्री होणार याबाबत आता सर्व घडामोडी रंगणार आहेत.
विजयी जागा अशा ( एकूण जागा २४३)
एनडीए – १२५
महागठबंधन – ११०
इतर ८
….
पक्षनिहाय
जेडीयू – ४३
भाजप – ७४
राजद – ७५
काँग्रेस – १९
लोजप – ०१
इतर – ३२
…..