पाटणा – कोरोनाकाळात होत असलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण किट तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. तीन टप्प्यात या निवडणुका होणार असून पहिल्या टप्प्यातील २ लाख २५ हजार ९४१ कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर, मास्क यासारख्या संरक्षण साहित्यांच्या पॅकेजिंगचे काम सुरु करण्यात आले आहे.
यात प्रत्येक मतदान केंद्रासाठी सहा कर्मचारी आणि २० टक्के सुरक्षित मतदान कर्मचार्यांसाठी सामग्रीच्या पॅकेजिंगचे काम सुरु आहे. निवडणुकीच्या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खास उपाययोजना केल्या जात आहे. मतदान करण्यासाठी केंद्रांवर कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे. तसेच सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षेसंबंधी सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत. सॅनिटायझर, मास्क, फेस शिल्ड आणि ग्लोजचे वितरण होणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने बिहार वैद्यकीय सेवा व पायाभूत सुविधा कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमएसआयसीएल) यांना कोरोनाविरूद्ध संरक्षणासाठी राज्यभरातील निवडणूक कर्मचारी आणि सुरक्षा दलांना संरक्षणात्मक साहित्यांचे पॅकेजिंगचे निर्देश दिले आहेत. पाटणा, मुजफ्फरपुर आणि पूर्णिया याठिकाणी हे पॅकेजिंग होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मल स्कॅनर बसवले जाणार आहेत.