नवी दिल्ली – बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत तिसऱ्या टप्प्याचे मतदान आटोपले असून वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल जाहीर होत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा संधी मिळणार की तेजस्वी यादव यांना चाल मिळणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. एक्झिट पोलनुसार, महागठबंधनला अधिक जागा मिळण्याची चिन्हे आहेत. तसे झाले तर लालू प्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री होऊ शकतात. तर, तिसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी ही आता शेवटची निवडणूक असेल, अशी भावनिक साद घालणारे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पराभव होण्याची चिन्हे एक्झिट पोलने वर्तविली आहेत. एक्झिट पोलनुसार निकाल लागले तर ही बाब भाजपसाठी अतिशय परिणामकारक ठरणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीचा निकाल प्रत्यक्ष काय लागतो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मतमोजणी येत्या १० नोव्हेंबरला होणार आहे.
वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल असे