मुंबई – शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीत ४० ते ५० जागा लढवण्याची घोषणा केली असून त्यादृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणूकीत युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी शिवसेना ही पप्पू यादव यांच्यासह बिहारमधील अनेक स्थानिक पक्षांना बरोबर जाऊ शकते.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या सहकार्याने सरकार चालवणाऱ्या शिवसेनेला बिहारमधील युतीबाबत विचारले असता, शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, स्थानिक पक्ष आपल्याशी बोलू इच्छित आहेत. याबाबत राऊत म्हणाले की, पुढच्या आठवड्यात आम्ही पाटण्यात जाऊन याची चाचपणी करु. युतीबाबत अद्याप कुणीही बोलले नाही. पप्पू यादव यांच्यासह बिहारमधील अनेक स्थानिक पक्षांना शिवसेनेशी बोलायचे आहे.
दरम्यान, एलओचे अध्यक्ष पप्पू यादव यांनी सांगितले की, त्यांची पीडीए युती घरात बसून ट्विट-ट्वीट खेळत नाही तर रस्त्यावर संघर्ष करत आहेत. अखिल भारतीय अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार एसएम आसिफ आणि अखिल भारतीय मुस्लिम मजलिसचे राष्ट्रीय अध्यक्ष वासी अहमद यांनी पीडीएला पाठिंबा जाहीर केला.
तसेच यादव म्हणाले की, तेथे लहान पक्षांचा सन्मान होत नाही, ते एनडीए असो वा महायुती. छोट्या पक्षांचे संरक्षण करण्याची महायुतीत कॉंग्रेसची जबाबदारी होती पण पक्षाने तसे केले नाही. अर्जक अधिकारी दल, आझाद भारत पार्टी, इंडियन बिझनेस पार्टी, शोषित समाज पार्टी, राष्ट्रीय जन उत्थान पार्टी, मागास समाज पार्टी आणि भारतीय संगम पार्टी यांनीही पीडीएला पाठिंबा जाहीर केला आहे.