पटना – बिहारमध्ये आज साडेचार वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ नितीश कुमार सातव्यांदा घेणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुध्दा करण्यात आली आहे. नव्या सरकारमध्ये भाजपने सुशील मोदीं यांचा पत्ता कट केला असून त्यांच्या जागी तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी हे दोन उपमुख्यमंत्री भाजपचे असणार आहे. भाजप आणि जेडीयूचे ६-६ मंत्री आणि वी-व्हीआयपी व हम पार्टीचे प्रत्येकी एक मंत्री शपथ घेणार आहे.
बिहारचा निकाल घोषित झाल्यानंतर मुख्यमंत्रीपद कोण होणार याबाबत चर्चा होती. पण, काल त्याला पूर्ण विराम मिळाला. पण, त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद बाबत चर्चा सुरु झाली. आता तेही स्पष्ट झाले आहे. सुशील मोदी हे गेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. त्यांचे नितीशकुमार बरोबर चांगले संबधही होते. असे असतांना त्यांचा पत्ता कट करुन भाजपने नवी समीकरण समोर ठेऊन दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री नितीशकुमार असले तरी सरकारमध्ये आपले वर्चस्व असावे म्हणून मुख्यपदे आपल्याकडे ठेवण्याचे धोरण भाजपचे आहे.