इगतपुरी – तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या चिंचलखैरे या गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. भोराबाई महादू आगिवले (६०) असे महिलेचे नाव आहे. ती झोपडीमध्ये एकटीच राहत होती. रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यात या महिलेला ओढत बिबट्याने वैतरणा नदी जवळ नेल्याचे दिसून आले. वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, परिमंडळ अधिकारी पी. के. डांगे, वनरक्षक एम. बी. धादवड, के. के. हिरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.