नाशिक – इगतपुरी जवळील कुरुंगवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध जखमी झाला आहे. कान्हू चिमा धुपारे ( वय ७५) असे त्यांचे नाव आहे. झोपडीबाहेर झोपलेले असतांना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. उपचारार्थ त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावाच्या परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्याची दखल घेत वनविभागाकडून गावाच्या परिसरात लवकरच पिंजरा लावला जाणार आहे.