नाशिक – दोनवाडे गावात बिबट्याने हल्ला केल्यानंतर वनविभागाने अखेर पिंजरा लावला आहे. वनपरिमंडल अधिकारी अनिल अहिरराव, वनरक्षक विजय पाटील, राजेंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.
भगूर परिसरातील दोनवाडे येथे बिबट्याने दुचाकीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. दोनवाडे येथील संतोष शिवाजी सांगळे (वय ४०) हे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ठुबे पोल्ट्री फॉर्म जवळून घरी परतत होते. त्याचवेळी बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला. त्यात सांगळे जखमी झाले. याचवेळी सांगळे यांनी जोरजोरात आरोळ्या मारल्या तसेच आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या अंधारात पसार झाला. जखमी सांगळे यांना उपचारार्थ भगूर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे दोनवाडे परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. बोराडे वस्ती परिसरात वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी भाऊसाहेब शिरोळे, शरद शिरोळे, शांताराम सांगळे, पप्पू ठुबे आदी ग्रामस्थांनी केली आहे.