नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिन समारंभाचा शेवटचा सोहळा असलेला बिटींग रिट्रीट विजय चौकाच्या ठिकाणी सुरू असतानाच तेथून काही अंतरावर असलेल्या इस्रायली दुतावासाजवळ स्फोट झाला. या स्फोटामुळे अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. घटनेची दखल घेत पोलिस आणि फॉरेन्सिकचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहचले आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त एस एन श्रीवास्तव यांनी सांगितले की, राजेश पायसट मार्क येथे स्फोट झाला. स्फोटाच्या ठिकाणापासून इस्रायली दुतावास अवघे १५० मीटर अंतरावर आहे. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. याप्रकरणी सुरक्षा यंत्रणांनी गतीने तपास सुरू केला आहे. तसेच, याची दखल घेत देशातील सर्व विमानळासह महत्त्वाच्या ठिकाणी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
https://twitter.com/ANI/status/1355133616691417088