नाशिक – बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल (बीएनआय)च्या नाशिक चॅप्टरचा शुभारंभ झाला आहे. नाशिक चॅप्टरच्या अध्यक्षपदी अभिषेक बिदावत, उपाध्यक्षपदी सुकृत भारती तर खजिनदारपदी प्रवीण कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल (बीएनआय) ही एकमेकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणारी व्यावसायिक व अंतर्राष्ट्रीय संस्था आहे. अश्या प्रकारे काम करणारी ही जगातली सर्वात यशस्वी संस्था आहे. ९८१७ पेक्षा अधिक चैप्टर जगभरातील ७४ देशात असलेली ही संस्था पस्तीस वर्षे जुनी असून तिचे आज २.६९ लाख सभासद आहेत.
बीएनआय सभासद साप्ताहिक मीटिंग मध्ये भेटून एकमेकांस व्यवसायाच्या संधी देतात व उद्योग व्यावसाय संबंधी चर्चा करतात. १९८५ साली डॉ आयवन मायस्नर यांनी बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल बीएनआयची स्थापना केली.
“आता पर्यंत नाशिक मध्ये बीएनआय च्या माध्यामातून सभासदांनी १०८ कोटींचा व्यावसाय मिळवला आहे. एका सभासदास बारा कोटींची एक सिंगल ऑर्डर मिळाली आहे.” असे बीएनआयचे कार्यकारी संचालक श्री विक्रम माथूर यांनी बीएनआयच्या यशाबद्दल सांगितले. “मागील वर्षात बीएनआय सभासदांनी जगभरात १२.२ अब्ज व्यवसाय रेफरल एकमेकांना दिले ज्यातून १२,२५२ कोटी रुपये सभासदांनी कमावले.”
बीएनआय चैम्पियन्स हा विविध व्यवसाय करणार्या आणि जागतिक महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या व्यावसायिकांचा चॅप्टर आहे. सर्व सभासद तंत्रज्ञान कुशल आहेत व व्यवसाय विस्तार करू पाहत आहेत. बीएनआय चे वैशिष्ट्य हे आहे की प्रत्येक चॅप्टर मध्ये एका व्यवसायातील एकच सभासद घेतला जातो. त्यामुळे सभासदांना मिळणार्या व्यवसाय संधींची खात्री व निश्चिंतता असते.
“नाशिक मध्ये व्यवसायांची विविधता आहे आणि मला अत्यंत आनंद होत आहे की बीएनआय चा लाभ उद्योजक व व्यावसायिकांना नाशिक मध्ये होत आहे. मला स्वतःला माझी कम्पनी UMS Tech Labs मध्ये बीएनआय च्या माध्यामातून काही मोठी कामे मिळाली. बीएनआय चैम्पियन्सचे आज ४३ उद्योजक सभासद आहेत. नाशिक मधील दुसर्या क्रमांकाचा चॅप्टर आहे.” असे लाँच डायरेक्टर शशांक तोडवाल यांनी सांगितले. शंभर पेक्षा जास्त व्यावसायिक या लाँच चा सोहळ्यात सहभागी झाले. बीएनआय अर्था या बीएनआय चॅप्टरचा मैत्री २०२१ हा सर्वात मोठा ऑनलाईन नेटवर्किंग कार्यक्रम १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ६:३० आयोजित करण्यात आला आहे. सर्व व्यावसायिकांनी त्याचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी 9881472930 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.