मुंबई – बिग बॉस-१० च्या निमित्ताने चर्चेत आलेला स्वामी ओम याचे वादाशी जुने नाते आहे. ते स्वयंभू बाबा म्हणून आणि इतरही अनेक नावांनी ओळखले जायचे. मात्र बिग बॉस-१० मध्ये आल्यानंतर तो एक विशेष चेहरा म्हणून पुढे आला. इडियट बॉक्सच्या विश्वास त्याची वेगळी ओळख तयार झाली. स्वामी ओमला एस. सदाचारी साईबाबा, विनोद आनंद झा या नावांनीही ओळखले जात होते. स्वामी ओमला त्याच्या हरकतींसाठी अनेकदा मारही पडला आहे. एकदा तर चोरीसाठी अटकही झाली होती.
स्वामी ओम आपल्या गळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या एक डझल माळा घालायचे. तसेच गळ्यात एक मोठासा ओमही घालायचे. कोणत्याही मठातून त्यांना उपाधी मिळालेली नाही, मात्र स्वतःला बाबा म्हणवून घेण्यात त्यांना आनंद वाटायचा. राजकीय आणि कुंडली बघणारा बाबा म्हणूनही त्याने स्वतःची ओळख लोकांना सांगितली. त्यामुळे काही राजकीय पुढारीही त्याच्या गळाला लागले होते.
राजकीय पक्षाशी संबंधित
स्वामी ओमने एस्ट्रॉलॉजीमध्ये एमए केले होते. अध्यात्मिक आणि राजकीय अशा दोन्ही मार्गांनी दुसऱ्यांसाठी जीवन समर्पित करण्याची इच्छा असल्याचे ते लोकांना सांगायचे. दिल्लीतील पालिका बाजारमधील एका स्वतंत्र राजकीय पक्षाशी आपला संबंध असल्याचे ते कायम सांगायचे. दिल्लीत नाथुराम गोडसे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्याला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मात्र भाषणासाठी उभा होताच लोकांनी त्याची पिटाई केली.
बिग बॉस-सिझन १०
सलमान खानच्या बीग बॉस या शोच्या १० व्या मोसमाचा ते एक भाग होते. सलमान खानने त्यांना स्टेजवर आमंत्रित केले तर अत्यंत प्रभावी पद्धतीने त्यांनी आपली ओळख सांगितली. याच शोमध्ये आपल्या सहकाऱ्याच्या अंगावर मुत्र फेकण्याच्या आरोपात त्याच्यावर कारवाई झाली होती. त्यानंतर त्याची शोमधून हकालपट्टीही करण्यात आली.