मुंबई – टीव्हीवरील लोकप्रिय मालिका बिग बॉसचा ग्रँड फिनाले आज सायंकाळी संपन्न होणार आहे. बिग बॉसचे १४वे पर्व सध्या सुरू आहे. ग्रँड फिनाले मध्ये राखी सावंत, रुबिना दिलाईक, निक्की तांबोळी, अली गोनी, राहुल वैद्य यांचा समावेश आहे.
बिग बॉसच्या विजेत्याला दरवेळी प्रमाणे तब्बल ५० लाखांचे बक्षिस मिळणार का याची अनेकांना उत्सुकता आहे. घरात असलेल्यांना एक टास्क पूर्ण करावे लागणार आहे. विजेत्याला ५० लाख रुपयांची घोषणा झाली तर विजेत्याला जीएसटी भरावा लागणार आहे. सध्या ही रक्कम १० टक्के आहे. त्यामुळे विजेत्याला ५ लाख रुपये जीएसटी भरावा लागेल. परिणामी, विजेत्याला ४५ लाख रुपयांचीच रक्कम पदरी पडणार आहे.