मुंबई – सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया आवडीची जाणीव त्यांच्या सर्व चाहत्यांना आहे. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ब्लॉगवर ते नेहमी सक्रिय राहतात, आपल्या कामाच्या व्यस्त (बिझी ) वेळापत्रकातही अमिताभ हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधतात. पण अलीकडेच त्यांनी एक कविता पोस्ट केली असून त्यामुळे वाद निर्माण होऊन त्यांच्यावर काव्य चोरीचा आरोप आहे.
अमिताभ बच्चन यांच्या या कवितेबद्दल आता वाद वाढला आहे. कारण तिशा अग्रवाल नावाच्या एका महिलेने दावा केला आहे की, ही तिची कविता आहे. बिग बी फेसबुक पोस्टच्या खाली तिशा यांनी भाष्य केले आहे की, त्याचे क्रेडिट आपल्याला देण्यात यावे. तिशाने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे, जेव्हा अमिताभ बच्चन आपल्या पोस्टची कॉपी करतात मात्र क्रेडिटही देत नाहीत. त्यामुळे दुःख वाटत झाले आहे.
दरम्यान, २४ एप्रिल रोजी टिशा अग्रवाल यांनी ही कविता लिहिली असून ती कविता तिने फेसबुकवरही पोस्ट केली, असे म्हटले जाते. तिशा कवयित्री असून फेसबुकवर अशा कविता लिहितात. मात्र, याबद्दल अद्याप अमिताभ बच्चनकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्याच वेळी, टिशाने योग्य पावले उचलणार असल्याचे सांगितले आहे. परंतु ती पुढे काय करणार आहे ? याबद्दल माहिती मिळाली नाही. या कवितेमुळे अनेक लोक तिशाला पाठिंबा देत आहेत.
……
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या फेसबुकवर एक कविता लिहिली, जी खालीलप्रमाणे आहे…..
(दरअसल अमिताभ बच्चन ने अपने फेसबुक एक कविता लिखी, जो कुछ इस प्रकार है- )
थोड़ा पानी रंज का उबालिये
खूब सारा दूध खुशियों का
थोड़ी पत्तियां ख्यालों की..
थोड़े गम को कूटकर बारीक,
हंसी की चीनी मिला दीजिये..
उबलने दीजिये ख्वाबों को
कुछ देर तक..!
यह जिंदगी की चाय है जनाब..
इसे तसल्ली के कप में छानकर
घूंट घूंट कर मजा लीजिये…!!
दरम्यान, या प्रकरणी अद्याप अमिताभ यांनी काहीही प्रतिक्रीया दिलेली नाही.
अमिताभ यांची पोस्ट अशी