मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर शिवतीर्थ येथील स्मृतीस्थळाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. मात्र, कोरोनाची स्थिती पाहता शिवसैनिकांनी याठिकाणी गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळपासूनच शिवसैनिक याठिकाणी येत आहेत. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मातोश्री या निवासस्थानी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले होते.