पुणे – प्रत्येक विद्यार्थ्यात अर्थात बालकात एक पालक असतो…पालकात शिक्षक आणि प्रत्येक शिक्षकात एक विद्यार्थी; आणि हे तिन्ही घटक प्रत्येक घरात कमी जास्त प्रमाणात असतातच. या तिघांना एकत्र आणण्याचा एक प्रयत्न ‘बालक पालक’ या मुक्त व्यासपीठाच्या निमित्ताने झाला.
सहभागी होत अनुभव घेत, संवाद साधत व्यावहारिक शिक्षणाचा आनंद आणि तोही घरबसल्या घेता यावा यासाठी कार्यशाळा, संवादसत्रे, कृतिसत्रे, व्याख्याने आणि मुलांसाठी वैविध्यपूर्ण स्पर्धा आयोजित करून संवादातून सुसंवाद ऑनलाईन पद्धतीने साधण्याच्या प्रयत्नांचेही चांगले स्वागत झाले.. बघता बघता सुमारे आठ हजार जणांनी याला स्वीकारलं. याला थोडे व्यापक स्वरूप देण्याचा विचार पुढे आला आणि आपण बालक पालक फाउंडेशन या सेवाभावी सामाजिक संस्थेची नुकतीच नोंदणी कृत स्थापना झाली आहे.
करण्यासारखं खूप आहे, करावं तितकं कमीच आहे पण वर म्हटल्याप्रमाणे पालक-विद्यार्थी-शिक्षक या पैकी कोणत्याही भूमिकेतून आपण एकमेकांना या व्यासपीठाद्वारे व्यापक स्तरावर जोडलेले रहावे, अशी संस्थेची मनोमन इच्छा असून यात थोडी सुसूत्रता असावी यासाठी आपण विनामूल्य ऑनलाईन नावनोंदणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. खालील लिंकवर क्लिक करून बालक पालक फाउंडेशन मध्ये आपल्या क्षमतेनुसार-आवडीनुसार-सोयीनुसार सक्रिय होण्याचे आवाहन संस्थेने केले आहे..
अधिक माहितीसाठी : 8856862711