मानसिक समस्या निवारणासाठी वेबपेज आणि हेल्पलाईन
अकोला ः केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज रोजी नवी दिल्लीतील ‘मनोदर्पण’ वेबपेज आणि राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइनचा शुभारंभ केला. यावेळी मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे, उच्च शिक्षण विभाग आणि शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिवासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोविड-१९ या वैश्विक महामारीमुळे आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. बाल्य व किशोर अवस्थेतील मुले अधिक संवेदनशील असल्यामुळे त्यांच्यामध्ये अत्याधिक ताणतणाव, चिंता आणि भीती निर्माण होवू शकते. यासाठी त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी व त्यावर त्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी केन्द्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने ‘मनोदर्पण’ वेबपेज आणि टोल-फ्री हेल्पलाइनची सुरुवात केली.
विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ व कल्याणासाठी ‘मनोदर्पण’या वेबपेजच्या माध्यामातून त्यांच्या मानसिक व सामाजिक समस्या सोडविण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली असून त्यात शिक्षण क्षेत्रातील तसेच मानसिक स्वास्थ व मनोविकार तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती विद्यार्थ्यांतील सामाजिक स्वास्थ्याशी संबंधित समस्यांवर लक्ष देईल. त्यांना मार्गदर्शन, ऑनलाईन संसाधन आणि हेल्पलाईनच्या माध्यमातून त्यांना सामाजिक व मानसिक स्वास्थ्यावर समाधान करण्यासाठी सहाय्यता करतील.
असे आहे ‘मनोदर्पण’
- शाळा व विद्यापीठातील शिक्षक तसेच विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीना मार्गदर्शन करुन त्यांना दिशानिर्देश देणे.
- मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वेबसाइटवर वेबपृष्ठ, मनोविकारासंबंधी मदतीसाठी विमर्श, व्यावहारीक टिप्स, पोस्टर, व्हिडिओ यांच्या माध्यामातून काय करावे आणि काय करू नये तसेच वारंवार पडणारे प्रश्न ऑनलाईन सोडविणे.
- शाळा आणि विद्यापिठ स्तरावरील तसेच राष्ट्रीय स्तरावरील डेटाबेस आणि मार्गदर्शक सेवा नॅशनल हेल्पलाइन व टेलिफोन काउंसलिंग सेवेव्दारे स्वइच्छने देवू शकतात.
- एमएचआरडी द्वारे शाळा, विद्यापीठे आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइन सेवा आहे. ही हेल्पलाइन अनुभूवी तंज्ञाचा तसेच मनोवैज्ञानिक आणि इतर आरोग्य सेवेचा व इतर व्यावसायिकांच्या एका गटाद्वारे संचालित व नियंत्रित केली जावू शकते. आणि ही हेल्पलाईन कोविड -१९ च्या घटनेनंतरही चालू राहील.
- मनोसामाजिक सहाय्यता हॅन्डबुक, विद्यार्थ्यांचे जीवन कौशल्य आणि संस्कृतीची ऑनलाइन प्रकाशित केली जाते. या पुस्तकाव्दारे एफएक्यू तथ्य आणि कोविड -१९ च्या महामारीनंतर भावनात्मक आणि व्यवहार संबंधी लहान मुलांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंतच्या समस्या आणि साधनांचा समावेश आहे.
- मनोवैज्ञानिक आणि इतर आरोग्य व्यावसायिकांचा संपर्क, कौन्सिलिंग आणि शिक्षणाकरिता इंटरनेक्टिव ऑनलाईन चॅट प्लेटफॉर्म, जो विद्यार्थीं, शिक्षक आणि कुटूंबियांना कोविड -१९ च्या दरम्यान आणि त्यानंतर उपलब्ध होईल.
- वेबपेज अतिरिक्त संसाधन सामग्री वेबिनार, व्हिडिओ, पोस्टर,फ्लायर्स, कॉमिक्स आणि छोट्या चित्रपटांमध्ये ऑडिओ-विजुअल अपलोड करण्यात येईल. या माध्यमातून संपूर्ण देशभरातील वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्रित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
- कोविड १९ च्या प्रकोप नंतर भारत अर्थव्यवस्था पुनर्जीवित करण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान प्रधानमंत्री यांनी सुरु केले आहे. मानसिक स्वास्थ व कल्याणासाठी भाग म्हणून ‘मनोदर्पण’ याचा अभियानात समावेश केला आहे.