नाशिक – महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त सहजयोग अध्यात्मिक संस्थेतर्फे बारा भाषांमध्ये आत्मसाक्षात्काराची माहिती व अनुभूतीचा ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत हा कार्यक्रम तब्बल बारा तासांत पार पडणार आहे.
सहजयोग आध्यात्मिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आत्मसाक्षात्काराची माहिती दिली जाणार आहे. ‘लर्निंग सहजयोग’ या युट्युब चॅनलवर हा कार्यक्रम होणार आहे. यात ध्यानपद्धतीची माहिती तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
या लिंकवर क्लिक करा