वॉशिंग्टन – जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत संपूर्ण जगालाच रस असतो. भारतातही तीच परिस्थिती आहे. बायडेन विजयी झाल्यानंतर अमेरिका-भारत संबंधावर अनुकुल परिणाम होईल, असे म्हटले जाते.
अमेरिका हा जगभरातून आलेल्या लोकांचा देश आहे. अनेक लोक प्रत्येक देशामधून येथे स्थायिक झाले आहेत. इथल्या भारतीयांवरही लक्षणीय परिणाम होतो. यावेळी भारतीय वंशाच्या डझनाहून अधिक लोकांनी निवडणुका जिंकल्या आहेत. भारतीय-आफ्रिकन वंशाच्या कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्ष झाल्या आहेत.
भारताला आपला मित्र घोषित करूनही ट्रम्प हे एच 1 बी, एच -2 बी आणि इतर परदेशी व्हिसाबाबत निर्णय घेत राहिले. एच -1 बी व्हिसा भारतीयांसाठी खूप उपयुक्त आहे. सामान्यत: आयटी क्षेत्रातील व्यावसायिक हा व्हिसा घेतात. या व्हिसावर ट्रम्प यांचे बारीक लक्ष असूनही भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सतत वाढतच गेले. काही काळ ट्रम्प आणि मोदी यांच्यातील मैत्रीही अधिक खोल झाली. यामुळे त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या वेळी भारत भेट दिली. आता दोन्ही देशात आणखी अनुकुल संबंध निर्माण होतील, असेही म्हटले जाते.
सध्या चीनविरोधी धोरण अमेरिकेने आक्रमकतेने राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यात काही बदल होणार नाही. त्याचा भारताला फायदा होईल. मात्र, पाकिस्तानविषयी अमेरिकेचे आगामी काळात काय धोरण राहिल, यावबर बरेच काही अवलंबून आहे. आजपर्यंत अमेरिका हा पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात मदत करीत आला आहे. यापुढेही ते कायम राहिल का, बायडेन काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.