वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या देशातील एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा किंवा मृत्यूदंड देण्याची तरतूद बंद करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत बायडेन यांनी विजयी झाल्यानंतर प्रथमच हा निर्णय जाहीर केला होता.
मृत्यूदंडाच्या शिक्षेला विरोध करणारे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आहे. न्याय विभागाकडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या अधिकारापासून रोखण्यापूर्वी अध्यक्षांना सर्व कायदेशीर बाबी जाणून घेण्याची इच्छा आहे. तथापि, बायडेन यांच्याशी फाशीची शिक्षा संपुष्टात आणण्याबाबत चर्चेत सहभागी अधिकाऱ्यांना या विषयावर जाहीरपणे बोलण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्याचबरोबर संपूर्ण अमेरिकेच्या राज्यघटनेतून मृत्यूदंडाचे कलम रद्द करावे, अशी मागणीही करण्यात येत आहेत.