मुंबई – नागपूर-मुंबई मार्गावर बुलेट ट्रेन संभाव्यत: चालविण्यासाठी ७४१ किमी लांबीच्या हायस्पीड रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी सरकारने निविदा मागवल्या आहेत. हा मार्ग नाशिकमधूनच जाणार असल्याने नाशिकला हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारला जाणार आहे. यासंबधी प्रकल्प राबवणार्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला (एनएचएसआरसीएल) रेल्वेने सात नवीन हायस्पीड रेल कॉरिडॉरसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची जबाबदारी सोपविली आहे.
मुंबई-नाशिक-नागपूर मार्गावर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवर सर्वेक्षण, ओव्हरहेड, अंडरग्राउंड, भूमिगत उपयुक्तता आणि सबस्टेशनसाठी पॉवर यासाठी उपयोगात आणल्या जाणार आहेत. राष्ट्रीय ट्रान्सपोर्टरने त्यांची आर्थिक व्यवहार्यता आणि ते आकर्षित करू शकतील अशा अंदाजित रहदारीचे अनुमान काढण्यासाठी अन्य सात संभाव्य हायस्पीड कॉरिडॉरवर व्यवहार्यता अभ्यास सुरू केला आहे.
भारतीय रेल्वे ३०० किलोमीटर प्रतितास वेगाने बुलेट ट्रेन चालविण्यास कॉरीडोरच्या सक्षमतेकडे लक्ष देणार आहे. यात दिल्ली-वाराणसी (८६५ किमी) वाराणसी-हावडा (७६० किमी), दिल्ली-अहमदाबाद, मुंबई-नागपूर (७४१ किमी), मुंबई-हैदराबाद (७११ किमी), चेन्नई-म्हैसूर (४३५ किमी) अशी प्रस्तावित कॉरिडोअर उभारण्यात येणार आहेत. यासाठी एनएचएसआरसीएलने दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद या मार्गावर हायस्पीड रेल्वे कॉरिडोर आणि दिल्ली-लखनऊ-वाराणसी एचएसआर कॉरिडॉरसाठी निविदा पाठविल्या आहेत.
कोविड १९ मुळे अहमदाबाद-मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या वेळापत्रकांचे पूर्वमूल्यांकन करणे आवश्यक आहे, परंतु पुढील तीन ते सहा महिन्यांतच वाढीव मुदत दिली जाऊ शकते, असे रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. यादव यांनी सांगितले. रेल्वेच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत प्रकल्पासाठी ६३ टक्के जमीन अधिग्रहित करण्यात आल्याचे म्हटले आहे.