मुंबई – बॉलिवूड अभिनेता आणि स्टंटमॅन म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार ‘मॅन वर्सेस वाइल्ड’मध्ये बेयर ग्रिल्ससोबत स्टंट करताना दिसणार आहे. संबंधित व्हिडिओचा प्रोमो अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
जगप्रसिद्ध शो ‘मॅन वर्सेस वाइल्ड’मध्ये बॉलिवूडचा खिलाडी आणि स्टंटमॅन अक्षय कुमार बेयर ग्रिल्ससोबत स्टंट करणार आहे. अक्षय कुमारने यासंबंधीचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात बेअर ग्रिल्ससोबत अँडव्हेंचर करताना दिसत आहे. या प्रोमोची सुरुवात एका घनदाट जंगलातून होते. अक्षय कुमार एका हेलिकॉप्टरवर उभा असल्याचे दिसते आहे. त्यानंतर अक्षय कुमार एका नदीत पोहोताना दिसते आहे. अक्षय कुमारसोबत बेयर ग्रिल्सही एका ट्रकच्या मागे लटकताना दिसत असून चालत्या ट्रकमधून दोघेही खाली उतरतात. त्याचप्रमाणे नदीत भयानक मगरी दिसत आहेत. फ्लायओव्हरवर रश्शीच्या साहाय्याने अक्षय कुमार चढतांना दिसते आहे. स्टंटमॅन म्हणून ओळख असणारा अक्षय कुमार नेहमीच काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतो. यावेळी जगप्रसिद्ध ‘मॅन वर्सेस वाईल्ड’मधून तो चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.