न्यूयॉर्क – टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे संस्थापक एलन मस्क जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. केवळ ४९ वर्षीय मस्कची एकूण संपत्ती १८८५5 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. आणि अॅमेझॉनचे जेफ बिजोस यांच्या मालमत्तेपेक्षा ती दीड अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच मस्क यांनी बिजोस यांना मागे टाकले आहे. टेस्ला शेअर्स मागील वर्षाच्या तुलनेत आठपेक्षा जास्त वेळा वाढले आहेत, त्यामुळे त्यांच्या मालमत्तेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेअर्सच्या वाढीमुळे टेस्ला जगातील सर्वात मूल्यवान कार निर्माता कंपनी बनली आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कार निर्माता टेस्लामध्ये एलन मस्कची २० टक्के भागीदारी आहे. परिणामी, त्यांना ४२ अब्ज डॉलरची कमाई झाली आहे. गुरुवारी टेस्लाचे शेअर्स ७.४ टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. ब्लूमबर्ग बिलियनेर्स इंडेक्सनुसार एलनची संपत्ती अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बिजोसपेक्षा फक्त ७.८ अब्ज डॉलर्स कमी होता. तेव्हा जेफ बिजोसची संपत्ती १८७ अब्ज डॉलर्स होती, परंतु गुरुवारी टेस्लाच्या शेअर्समध्ये आलेल्या उच्चांकाने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलन आपले नाव कमावले.
टेस्लाच्या शेअर्समध्येही बुधवारी २.८ टक्क्यांनी वाढ झाली. कारण बुधवारी एलोन मस्कची संपत्ती १८१.१ अब्ज डॉलर्स होती ती गुरुवारी वाढून १८८.५ अब्ज डॉलर्सवर गेली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एलन हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सला मागे टाकत जगातील दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले होते. ब्लूमबर्ग बिलियनेर्स इंडेक्स ही जगातील ५०० सर्वात श्रीमंत लोकांची दररोजची रँकिंग बनवत असते.