लखनऊ – तब्बल २८ वर्षानंतर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात ३२ आरोपींनी विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात २६ आरोपी न्यायालयात उपस्थिती होते, तर सहा आरोपी व्हिडिअो कॅान्फन्सिंग व्दारे हजर होते. या प्रकरणात २५०० पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली होती. त्यात २५१ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. या प्रकरणाचा १७ वर्षे तपास सुरु होता. या निकालात बाबरी मशीद विध्वंस ही घटना पूर्वनियोजीत नव्हती, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असे म्हटले आहे. या निकालानंतर विश्व हिंदु परिषदेने आपल्या कार्यालयात लाडूचं वाटप केले. तर गृहमंत्री अमिल शाहांनी अडवणींना शुभेच्छा दिल्या. तर देशभरात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जात आहे.