नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतांना जपानी संशोधनानुसार कोरोना विषाणू मानवी त्वचेवर ९ तास सक्रिय असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नियमितपणे हात धुत राहणे अनिवार्य असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. जपानच्या वैद्यकीय चाचणीदरम्यान कोरोना विषाणू संबंधी नवीन माहिती समोर आली आहे. त्यानुसार जवळपास नऊ तास कोरोनाचा विषाणू त्वचेवर सक्रिय राहत असल्याने संसर्ग वाढण्याचा धोका जास्त असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. कोरोना विषाणू संबंधित दर दुसऱ्या दिवशी नवीन माहिती समोर येत आहे. त्यातच आता मानवी त्वचेवर ९ तास विषाणू सक्रिय राहत असल्याचे जपानी संशोधकांनी म्हटले आहे. त्यामुळे २० सेकंद ते १ मिनिटांपर्यंत हात स्वच्छ धुवावे असे मार्गदर्शन तज्ज्ञांनी केले आहे. तसेच बाहेरून आल्यावर नियमितपणे हात सॅनिटायझरने स्वच्छ करावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या नव्या ६१, ८७१ रुग्णांची नोंद झाली असून, १०३३ जणांचा मृत्यू झाला आहे.