बंगळुरू – कोरोना जवळपास सर्व राज्यांमध्ये हाहाकार माजवित असल्याची बाब समोर येत आहे. कर्नाटकातील बसवनहल्ली माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयातील तब्बल २६ विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब पुढे आली आहे. याची दखल घेत तत्काळ शाळा सील करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचीच चाचणी करण्यात येण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारनेही याी गंभीर दखल घेतली असून राज्यातील शाळा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाईन वर्ग बंद करण्यात आले आहेत.
Karnataka: Classes at Basavanahalli High School and College suspended after 26 students tested positive for #COVID19.
— ANI (@ANI) April 3, 2021