हर्षल भट, नाशिक
यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या संकटामुळे अगदी सध्या पद्धतीने साजरा झाला. यंदा ढोलताशाचा गरज नसला तरी भक्तीच्या सागरात बाप्पाचे आगमन आणि विसर्जन सर्वानी केले. नाशिकरोड येथील तरुणी कल्याणी शहाणे हिने बाप्पाचे मनोगत पत्राद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. साधेपणाने साजरा करण्यात आलेल्या उत्सवावर स्वतः बाप्पाच्या भावना पत्रातून मांडल्या आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नेटिझन्सने या पत्रास पसंती दर्शवली आहे.
गोंगाट, ध्वनिप्रदूषण यंदा नसल्याने बाप्पाला देखील यासगळ्याचा आनंद झाला आहे. दर्शनासाठी होणारी चेंगराचेंगरी, धक्काबुक्की यावर्षी बाप्पाला देखील शांतपणे सर्व भक्तांना आपलेसे करता आले अशी भावना तिने पत्रातून मांडली आहे. निसर्गाची होणारी हानी रोखण्यासाठी साध्या पद्धतीने सण-उत्सव साजरा करण्याचे यात म्हंटले आहे. परंतु यावर्षी साध्या पद्धतीने साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवावर बाप्पा खुश आहे. शांतपणे आणि संयमाने साजऱ्या झालेल्या सोहळा बाप्पाला आवडला आहे असे पत्रात म्हटले आहे. उत्सवादरम्यान यावर्षी सामाजिक कार्य आणि नैतिक जबाबदारीचे भान ठेवत अनेकांनी पुढाकार घेतल्याने मी प्रसन्न झालोय! असा संदेश बाप्पांनी दिला आहे. यावर्षी साध्या स्वागताने आनंदित झालो असलो तरी, सर्वांनी केलेला जल्लोष, ढोल-ताशांचा गजर, उधळला जाणारा गुलाल, पुष्पवृष्टी सुद्धा मिस करतोय त्यामुळे सगळं अनुभवायला मी पुन्हा नक्की येईन असे संदेश बाप्पाने भक्तांना दिला आहे. बाप्पाच्या विसर्जनावेळी सर्वजण भावुक होऊन आपली भावना व्यक्त करतात. कल्याणीने बाप्पाच्या मनोगताच्या भावना व्यक्त केल्याने सर्वस्तरावर या पत्रास पसंती मिळते आहे.
यंदा ढोलताशाच्या गजरात बाप्पा विराजमान झाले नाहीत. परंतु साध्या व त्याच भक्तिभावाने आपण सर्वानी बापाची सेवा केली. बाप्पाचे यासगळ्यावर काय मत असेल अशी भावना मनात आली तीच भावना पत्राद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कल्याणी शहाणे