व्हिएतनाम – परमेश्वर ज्याच्या सोबत असेल त्याचा गंभीर अपघात झाला तरीही काय फरक पडणार आहे! परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रुपात त्याच्या मदतीसाठी धावून जातोच. यावर विश्वास बसत नसेल तर व्हिएतनामची बातमी एेकून तुम्ही थक्क व्हाल. कारण १२ मजल्यावरून पडलेली एक दोन वर्षांची चिमुकली थेट डिलीव्हरी बॉयच्या हातात जाऊन पडल्याची घटना व्हिएतनाममध्ये घडली.
द डेली मेल आणि स्थानिक वर्तमानपत्रांनी दिलेल्या बातम्यांनुसार या घटनेची आता जगभरात चर्चा होत आहे. व्हिएतनाममधील हनोई येथील ही घटना आहे. सामानाची डिलीव्हरी द्यायला एक तरुण ट्रकमध्ये बसून एका बिल्डींगच्या बाहेर उभा होता. तो डिलीव्हरीसाठी प्रतिक्षा करीत होता. त्यातच त्याने बघितले की एक दोन वर्षांची चिमुकली बालकनीच्या कोपऱ्यावर लटकलेली आहे. तो तातडीने गाडीतून उतरला आणि धावत सुटला. वर जावे की खाली थांबावे त्याला सुचत नव्हते. तेवढ्यात मुलाचा हात सुटला.
त्याचवेळात डिलीव्हरी बॉय एका छतावर चढला. तो अश्याठिकाणी चढला की जर मुलगी पडली तर तिला पकडता येऊ शकेल. जगभर व्हायरल झालेल्या व्हिडीयोमध्ये मुलीची आई जोरजोराने ओरडताना व रडताना दिसत आहे. तिच्या डोळ्यापुढे मुलगी बालकनीतून खाली पडत होती. मात्र डिलीव्हरी बॉय परमेश्वरासारखा धावून आला आणि त्याने मुलीला पकडून घेतले.
हा व्हिडीयो लाखो लोकांनी आतापर्यंत बघितला आहे. मुलीच्या तोंडातून काही वेळ रक्त आले. त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. डिलीव्हरी बॉयच्या हातालाही थोडी दुखापत झाली आहे. जेव्हा घटना घडली तेव्हा मी फार विचार केला नाही.
मुलीला बघितले तेव्हा माझ्या मनात सर्वांत पहिले माझ्या स्वतःच्या मुलीचा विचार आला. तिचा चेहरा माझ्या डोळ्यापुढे होता. त्याच प्रेरणेतून मी धावत गेलो आणि मुलीला वाचवले. पण हे सगळे एक मिनीटाच्या आत झालेले आहे. ज्यावेळी मुलगी माझ्या हातात होती तेव्हा आपण इथपर्यंत कसा पोहोचलो, छत कसा पडतू शकतो, यावर विश्वासच बसत नव्हता, असे डिलीव्हरी बॉय म्हणाला.
बघा व्हिडिओ
https://twitter.com/Unicanal/status/1366438688557834240