नाशिक – कोकण गाव फाटा येथील महामार्ग पोलिस महिन्याची इंट्री नावाखाली मालवाहतूक व प्रवासी वाहतूक नाशिक जिल्ह्यातील वाहनांकडून ४०० रुपये प्रमाणे महिन्याकाठी ५००० वाहनांचे २० लाख अवैध स्वरूपात इन्ट्री घेत होते. संपूर्ण भारतातील गाड्या हायवेवरून ये जा करतात त्यांच्या कडून यापेक्षा मोठ्या प्रमाणात वसुली केली जाते. या अवैध वसुलीचा आकडा करोडो रुपये इतका असल्याचा गंभीर आरोप ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे नाशिक, धुळे अध्यक्ष सचिन जाधव यांनी पत्रक काढून केला आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या सहकार्याने ओझर जवळील कोकणगाव फाटा येथे असलेली महामार्ग पोलिस चौकी येथील इन्चार्ज असलेल्या महिला अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक वर्षा कदम व त्यांचे सहकारी उमेश सानप यांना ८००० रुपयाची लाच मागितली प्रकरणी ओझर पोलिस स्टेशनला काल सायंकाळी अटक करण्यात आली. या चौकीबद्दल असंख्य तक्रारी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नाशिक कार्यालयात वाहन चालक व मालक यांचे कडून आल्या होत्या. त्या अनुषंगाने ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कुलतरण सिंग अटवाल, वेस्ट झोन उपाध्यक्ष विजय कालरा, कॉर्डीनेशन कमिटी चैरमन अमृत लाल मदान,अंजु सिंघल दिल्ली एम सी मेंबर यांच्या मार्गद्शनाखाली नाशिक जिल्हा अध्यक्ष सचिन जाधव,किरण भालेकर, दीलीपसिंह बेनिवाल, अंजय सिंघ, अनिल कौशिक, विनायक वाघ, विनोद शर्मा अवतार सिंघ बिर्दी, परवेज पठाण,मारुती काकड, देव अग्रवाल,नानेश्र्वर वरपे, राजेश पवार, वेध प्रकाश झाझरिया, हरिभाऊ होळकर, निसार शेख ,सोनू शर्मा, संजय तोडी, अमन चोधरी, उत्तम कातकडे,हर गोविंद तिवारी, बिपिन पांड्ये, ईश्वर सोनवणे अतुल रावल, सत्यनारायन शर्मा, कैलास कासार, मारुती काकड , देवेंद्र विग, नारायण गांजवे, मकसुद घासी,अर्जुन राठोड,प्रवीण अग्रवाल, एन के तिवारी, ईश्वर बंसल व अन्य पदाधिकारी यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभगाकडे धाव घेऊन व त्यांच्या मदतीने या अवैध वसुलीचे बिंग फोडले..
यावेळी त्यांनी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसबद्दल बोलतांना सांगितले की, १९३६ पासून भारतातील परिवहन बंधुवर्गाचे (एनसीओ – पॉलिटिकल, सेक्युलर, न – प्रॉफिट बॉडी) प्रतिनिधित्व करीत आहे. ९५ लाख ट्रक, वाहतूकदार आणि सुमारे ५० लाख बसेस, टुरिस्ट टॅक्सी, मॅक्सी कॅब ऑपरेटर आणि ३५०० तालुके,जिल्हे कव्हर करून ,राज्यपातळीवरील युनियन आणि ट्रान्सपोर्ट युनियन अखिल भारतीय आम्ही येथे नमूद करू शकतो की देशातील जवळपास सर्व संघ, संघटना आणि प्रमुख परिवहन कंपन्या एआयएमटीसीशी संलग्न आहेत. हे रस्ते वाहतूक क्षेत्राशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेले २० कोटीहून अधिक लोकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या हितासाठी अथक प्रयत्न करत आहे. भारताचे रस्ता वाहतूक क्षेत्र हे “सामान्य माणसा” चे “आयुष्य” आहे जे “सामान्य माणसा” ची काळजी घेते व ही संस्था अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कोरोना लॉकडाऊन दरम्यान हे प्रमाणित झालेले आहे.