मुंबई – आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्याची पोलीस उपअधिक्षक जेस्सी प्रशांतीला तिचे वडील सर्कल इन्स्पेक्टर श्याम सुंदर यांनी सॅल्यूट मारणे खूप आवडलेले आहे. या दोघांची छायाचित्रे सोशल मिडीयावरही व्हायरल झाली असून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
विशेष म्हणजे प्रशासन बरेचदा अशा प्रकारांमध्ये उत्साही नसते. परंतु, आंध्र प्रदेश पोलीसने या फोटोसोबत ‘#appolice1stdutymeet brings a family together!’ असे लिहून शेअर केले. विशेष म्हणजे आंध्र प्रदेश पोलिसांनी हा फोटो शेअर केल्यावपर काही मिनीटांतच ७ हजार लाईक्स मिळाले होते. जेस्सी आणि श्याम यांच्या प्रमाणेच देशातील इतर ठिकाणची काही उदाहरणेही नेटकऱ्यांनी सोशल मिडीयावर अपलोड केली आहेत. त्याचेही चांगलेच कौतुक होत आहे. मध्यप्रदेशचे पोलीस उपनिरीक्षक अशरफ अली आणि त्यांची कन्या राज्य पोलीस प्रशिक्षण अधिकारी शाबेरा या दोघांचे छायाचित्रही व्हायरल करण्यात आले आहे. कोरोना काळात देशव्यापी लॉकडाऊन असताना शाबेरा सिधी जिल्ह्यातील माझोली ठाण्याची प्रमुख होती. त्यानंतर की दिवसांनी तिचे वडील अशरफ यांनाबी याच पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले. पहिल्याच दिवशी अशरफ यांनी रिपोर्टींग आफिसर असलेल्या मुलीला सॅल्यूट ठोकला तेव्हा एकच चर्चा झाली.
असेच एक छायाचित्र डीएसपी एआर उमाहेश्वरा शर्मा आणि त्यांची आयपीएस मुलगी सिंधू यांचेही फिरू लागले आहे. २०१४ मध्ये सिंधू आयपीएस झाली, तर तिचे वडील बरीच वर्षे नोकरी करून डीएसपी पदापर्यंत पोहोचले. अर्थात त्यानंतरही ते मुलीपेक्षा खालच्या पदावरच होते. सिंधू २०१८ मध्ये एसपी झाली. त्यानंतर काहीच महिन्यात म्हणजे सप्टेंबर २०१८ मध्ये तेलंगणा राष्ट्र समितीची एक भव्य सभा कोंगारा कला येथे झाली होती. त्यावेळी दोघेही याठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत होते.
दोघांनाही आपला आमना-सामना होईल, असे ध्यानी मनी नव्हते. अशात सिंधू सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सभास्थळी पोहोचली तर उमाहेश्वरा यांनी सॅल्यूट मारला. हा क्षण अनेकांनी कॅमेरात टिपला. त्यानंतर या सॅल्यूटचे महत्त्व लोकांना कळले आणि फोटो व्हायरल होऊ लागला.