मुंबई – स्पेनच्या राफेल नदालने विक्रमी तेराव्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवून आपणच क्ले कोर्टचा बादशहा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. गेल्या १६ वर्षात त्याने १३व्या वेळेस फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली. आपल्या तडाखेबाज खेळ यावेळीही करीत त्याने नोवाक ज्योकोविचला चांगलीच धूळ चारली. सरळ तिन्ही सेट जिंकून त्याने आपल्यातले कौशल्य दाखविले. या सामन्यात जोकोविच अक्षरशः हतबल असल्याचे दिसून आले.
नदालने आजपर्यंत एकूण २० ग्रँडस्लॅम मिळविले आहेत. त्यामुळे त्याने रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. नदालने आतापर्यंत फ्रेंच ओपन १३, अमेरिकन ओपन ४, विम्बल्डन २ आणि ऑस्ट्रेलियन ओपन १ असे २० ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.