डांगसौंदाणे – महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित ,प्रादेशिक कार्यालय नाशिक अंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय कळवणच्या वतीने बागलाण मधील पहिल्या आधारभूत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ आज डांगसौंदणे येथे बागलांणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजारसमितीचे संचालक संजय सोनवणे हे होते. प्रादेशिक कार्यालय कळवणचे अधिकारी टी.डी. मोरे ,सुवर्णा खैरनार -मोरे ग्रेडर पी. आर.खैरनार यांच्या उपस्थितीत आज या केंद्राचा शुभारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते सप्तशृंगी महाविदयलायच्या प्रांगणात करण्यात आला. गेल्या वर्षाहून अधिक काळ येथील शासकीय धान्य भरड खरेदी केंद्र बंद होते. .या भागातील आदिवासी जनतेने व शेतकऱ्यांनी आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे मागणी केल्याने आमदार बोरसे यांनी आदिवासी विकास महामंडळाकडे मका खरेदी केंद्र डांगसौंदणे येथे सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीचा पाठपुरावा बाजारसमितीचे संचालक संजय सोनवणे जेष्ठ पत्रकार हेमंत चंद्रात्रे यांनी केल्याने आज या केंद्राचा शुभारंभ करण्यात येऊन पहिल्याच दिवशी ५० क्विंटल मका खरेदी करण्यात आला. यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी बोलताना सांगितले की या भागात आधारभुत मका खरेदी केंद्र सुरू होणे गरजेचे होते. शेतकऱ्यांची मागणी लक्ष्यात घेता हे केंद्र सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. भविष्यात येथे शासनाचे गोदाम उभारून हे केंद्र कायमस्वरूपी सुरू होण्यासाठी प्रयत्न राहणार असून आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची भेट घेऊन लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना आमदार बोरसे यांनी दिले. तर हे केंद्र सुरू करण्यासाठी आमदार बोरसे यांचे प्रयत्न यशस्वी झाल्याने बाजारसमितीचे संचालक संजय सोनवणे यांनी आमदार बोरसे यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिकारी टी. आर. मोरे यांनी केले. आभार निलेश गौतम यांनी मानलेत. या वेळी शेतकरी डॉ सुधीर सोनवणे ,भाजपा तालुका उपध्यक्ष अनंत दीक्षित, दिगंबर भदाणे,कैलास केल्हे ,जाणता राजा मंडळाचे अध्यक्ष सोपान सोनवणे, माजी सरपंच मोठाभाऊ सोनवणे, मनोहर सोनवणे, साहेबराव बोरसे, पंढरिनाथ सोनवणे, , मनोहर सोनवणे, नंदू बैरागी, डांगसौंदाणे उपसरपंच सुशीलकुमार सोनवणे,अंनंत गायकवाड,रवींद्र सोनवणे, सखाराम खैरनार, भिका पवार, गणेश सोनवणे, संतोष परदेशी,प्रभाकर सोनवणे तुषार चिंचोरे, सुमेध चंद्रात्रे, आदिसह शेतकरी उपस्थित होते.