– बर्ड फ्लूग्रस्त वाठोडा परिसरात पशुसंवर्धन विभागाचे कलिंग ऑपरेशन;
– वग्रीपाडा, व बारीपाडा परिसरातील असंख्य कोंबड्यांचे कलिंग…
– ११९२ कोंबड्याचे कलिंग केल्याची माहिती
–
डांगसौंदाने – बागलाणच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात बर्ड फ्लू ने एकाच शेतकऱ्याच्या तीनशे कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेत बुधवारी या परिसरात पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थित या दोन्ही गावांमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या शीघ्र कृती दलाने कलिंग ऑपरेशन राबवले. यामध्ये या दोघां गावा मधील असंख्य कोंबड्या या पथकाने शास्त्रोक्त पद्धतीने पकडून प्रशासनाने केलेल्या खड्ड्यात पुरण्यात आल्या. या ऑपरेशन दरम्यान आमदार दिलीप बोरसे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे.
दरम्यान आज जिल्ह्याचे पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ सुधाकर शिरसाठ ,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ बाबुराव नरवाडे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ विष्णू गरजे यांच्यासह सहायक आयुक्त डॉ गिरीश पाटील, डॉ विजय पाटील, डॉ बाळासाहेब होन, डॉ धनराज चौधरी, डॉ प्रदीप झोड ,डॉ मिलिंद भणगे यांनी शीघ्र कृती दलाच्या टीमचे नेतृत्व करीत संपूर्ण कलिंग प्रक्रिया पूर्ण केली व या रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव थांबण्यासाठी विविध मार्गदर्शक सूचना या भागातील आदिवासी जनतेला करण्यात आल्या. प्रशासनाला कलिंग ऑपरेशन दरम्यान पक्षी पुरण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने पंचायत समितीचे माजी सदस्य सोमनाथ सूर्यवंशी यांनी आपल्या खासगी जागेत जागा उपलब्ध करून देत प्रशासनाला सहकार्य केले ग्रामपंचायत प्रशासन कलिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात असल्याची माहिती सरपंच लक्ष्मण महाले ग्रामसेवक योगेश भामरे यांनी दिली आहे. दरम्यान बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी आदिवासी जनतेच्या झालेल्या नुकसानीची दखल घेत प्रशासनाला सर्व नुकसान भरपाई देण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्याना दिले आहेत.
दरम्यान प्रशासनाने नेमके किती पक्ष्याचे कलिंग केले हे जाणून घेण्यासाठी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित अधिका-यांनी आपले फोन स्विच ऑफ केल्याने उशिरा पर्यंत खरी माहिती मिळू शकली नाही.

कलिंग म्हणजे काय ?
संसर्ग झालेले पक्ष्यांना सामुहिकरित्या नष्ट करणे त्याला कलिंग म्हणतात. बागलाण तालुक्यातील वाठोडा, वग्रीपाडा व बारीपाडा परिसरातील कलिंग ऑपरेशन केले गेले. त्यात कोंबड्याची मान पिळून त्यांना मारले गेले. त्यानंतर त्यांना सामूहिकरित्या पुरवले गेले असे एका अधिका-याने सांगितले.